शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५

अँंड्रॉईड मोबाईल वर मराठीत टंकण्यासाठी (टाईप करण्यासाठी) हा पण एक पर्याय उपलब्ध आहे.

(One more method to type in Marathi on Android Mobiles)

आपल्याला मोबाईल वर बर्‍याच वेळा वेगवेगळ्या कारणांसाठी टंकायला (टाईप करायला) लागते. आपल्यातले (म्हणजे मराठी भाषीक) बर्‍याच जणांना मराठीमधुन (म्हणजे देवनागरी लिपीमधुन) सुद्धा टंकायची आवश्यकता लागते. पण कधीकधी मोबाईलमध्ये मराठीभाषेसाठी support नसतो, मराठीत टंकण्यासाठी लागणारे software नसते किंवा मराठीत टंकण्यासाठी लागणारे software सुरु केलेले (enable केलेले) नसते.

जर आपला मोबाईल अ‍ॅंड्रॉईड प्रणालीचा असेल तर त्यात मराठीतुन टंकणे सहज शक्य आहे. Google नी देवनागरीत टंकण्यासाठी 'Google Hindi Input' हे अ‍ॅप बनवलं आहे जे 'Google Play Store' वर विनामुल्य उपलब्ध आहे. त्यासाठी करायची कृती.



1. आपल्या मोबाईल वर 'Google Play Store' वरुन 'Google Hindi Input' हे अ‍ॅप डाऊनलोड करा आणि Install करा.
2. ज्या अ‍ॅप मध्ये आपल्याला टंकायचे आहे. ते अ‍ॅप उघडा.
3.त्यात इनपुट मेथड 'Google Hindi Input' ची स्थापना (Set) करा.































 4. मग वरिल चित्र क्र. 1 मध्ये दाखवल्या प्रमाणे की-बोर्ड वर '' ह्या ठिकाणी क्लिक करुन देवनागरी की-बोर्ड निवडा, आणि चित्र क्र. 2 मध्ये दाखवल्या प्रमाणे की-बोर्ड वर '' ह्या ठिकाणी क्लिक करा. असं केल्यावर तुम्हाला 'Writing Pad' खालिल प्रमाणे दिसेल.




























5. आता 'Writing Pad' वर लिहिण्यासाठी जागा जिथे दाखवली आहे तिथे आपण बोटानी किंवा Stylus नी मराठीत (देवनागरीत) लिहिले की आपोआप मराठीत टंकीत होते.


आहे की नाही सोपा पर्याय मराठीमध्ये टंकन करण्याचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा